Weather Update : राज्यात होणार ट्रिपल अटॅक? हवामान खात्याचा थेट इशारा; थंडी, पाऊस अन् मोठं संकट …

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा हा मुक्काम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

Weather Update : राज्यात होणार ट्रिपल अटॅक? हवामान खात्याचा थेट इशारा; थंडी, पाऊस अन् मोठं संकट …

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा हा मुक्काम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहणार आहे. तर थंडीचा कडाका देखील पुढील काही दिवस कायम राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही पारा घसरलेलाच राहील. 

हेही वाचा- Maharashtra Municipal Election: बाळासाहेबांचे स्वप्न माझ्यामुळे पूर्ण होत असेल तर…; गिरीजा ओकच्या त्या प्रश्नावर फडणवीस स्पष्टचं बोलले
भारतीय हवामान खात्याकडून उत्तर भारतातील 17 शहरांवर जोरदार थंडीचा मारा बसणार असून तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी आणि कर्नाटक या चार राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील काही भागात थंडीची लाट तीव्र जाणवणार असल्याती शक्यता आहे. यावेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात किमान तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस राहणार असून विदर्भातही थंडीचा जोर कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात गारठा जाणवणार आहे. तर जळगाव, पुणे, मालेगावर भंडारा, नाशिक, गोदिंया येथे 10 अंश सेल्सिअस तापमान असून  पुण्यात किमान तापमान इतका असणार आहे. तसेच धुळ्यात नीचांकी 6 अंश सेल्सिअस तापमान, परभणी येथे 6.6 अंश सेल्सिअस तापमान आणि अहिल्यानगर येथे 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number