स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

भंडारा येथून जवळच असलेल्या खरबी या गावातील स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह बोरीमध्ये आढळून आला आहे. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीला आली आहे. महिलेची ओळख अद्यापही पटलेली नसुन ओळख पटू नये म्हणून महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. घटनास्थळी जवाहरनगर पोलिसांचा ताफा दाखल झाला असून ग्रामस्थांनी गर्दी केली आह. पोलिसांच्या तपास सुरु आहे. भंडारा […]

स्मशानात आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

भंडारा येथून जवळच असलेल्या खरबी या गावातील स्मशानभूमीत अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह बोरीमध्ये आढळून आला आहे. ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीला आली आहे. महिलेची ओळख अद्यापही पटलेली नसुन ओळख पटू नये म्हणून महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. घटनास्थळी जवाहरनगर पोलिसांचा ताफा दाखल झाला असून ग्रामस्थांनी गर्दी केली आह. पोलिसांच्या तपास सुरु आहे.

भंडारा येथून जवळच असलेल्या खरबी या गावातील स्मशानभूमीत हा मृतदेह आढळून आला आहे. अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह हा एका पोत्यात बांधून तिथे स्मशानभूमीत सोडण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. भंडारा पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पोते खोलून पाहिले असता त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.

“जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खरबी या गावाच्या स्मशानभूमीमध्ये अज्ञात आरोपीने एका महिलेचा मृतदेह या ठिकाणी आणून टाकला होता. अंदाजे ३५ ते ४५ वयोगटातील ही महिला असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या हातात दोन बांगड्या होत्या. तसेच काळ्या रंगाचे मंगळसूत्रही गळ्यामध्ये आहे. या महिलेला एका पोत्यामध्ये बांधून याठिकाणी आणून टाकले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number