Homeताज्या बातम्याPune News : बाबो! वीजबिल 800 वरून थेट एक लाख, महावितरणचा अजब कारभार; ग्राहक म्हणाला, इतकं बिल भरणं केवळ अशक्य
Pune News : बाबो! वीजबिल 800 वरून थेट एक लाख, महावितरणचा अजब कारभार; ग्राहक म्हणाला, इतकं बिल भरणं केवळ अशक्य
पुण्यातील डोणजे गावातील एका ग्राहकाला १० बाय १० च्या घरासाठी एक लाखांचा वीजबिल आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्राहकाला यापूर्वी जास्तीत जास्त 800 रुपये बील आलं होतं. एक लाखाच्या वीजबिलाबाबत महावितरण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. या ग्राहकाने बिलाबाबत माहिती देताना सांगितले की, एक लाख रुपय वीजबिल भरण्याची आमची ऐपत नाही. गेल्या महिन्यात रुपये बील आलं […]
पुण्यातील डोणजे गावातील एका ग्राहकाला १० बाय १० च्या घरासाठी एक लाखांचा वीजबिल आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्राहकाला यापूर्वी जास्तीत जास्त 800 रुपये बील आलं होतं. एक लाखाच्या वीजबिलाबाबत महावितरण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. या ग्राहकाने बिलाबाबत माहिती देताना सांगितले की, एक लाख रुपय वीजबिल भरण्याची आमची ऐपत नाही. गेल्या महिन्यात रुपये बील आलं होतं. एक टेबल फॅन, टीव्ही, आणि फ्रीज इतक्याच वस्तू त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे.