कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान

जम्मू-काश्मीर, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णयाला जवळपास चार वर्ष होत आली आहेत. त्यावरून देशात अद्याप राजकारण सुरु आहे. कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात घेतले असून याची सुनावणी ११ जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठासमोर नेमण्यात […]

कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान

जम्मू-काश्मीर, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णयाला जवळपास चार वर्ष होत आली आहेत. त्यावरून देशात अद्याप राजकारण सुरु आहे. कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात घेतले असून याची सुनावणी ११ जुलैपासून सुरु होणार आहे. यासाठी पाच न्यायाधीशांचे घटनापीठासमोर नेमण्यात आले आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातल्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ११ जुलैपासून सुनावणी होणार आहे. कलम ३७० रद्द करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, जस्टिस एसके कौल, जस्टिस संजीव खन्ना, जस्टिस बीआर गवई आणि जस्टिस सूर्यकांत शामिल यांचा घटनापीठामध्ये समावेश आहे. २ मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच या याचिका सूचीबद्ध केल्या जात आहेत.

ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्र सरकारकडून कलम ३७० संदर्भात अधिसूचना जारी केली. त्यानंतर चार महिन्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झाली होती. प्रेम नाथ कौल आणि संपत प्रकाश यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जायला हवे, असा निर्णय दिला होता. २ मार्च २०२० मधील एका निर्णयवेळी खंडपीठाने, हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खडंपीठाकडे पाठवण्याची गरज नसल्याचे म्हटले. त्यानंतर यावर सुनावणी झाली नाही. एप्रिल २०२०२मध्ये सरन्यायाधीस एनव्ही रमन्ना होते, तेव्हा पुन्हा एकदा सूचीबद्ध करण्याची मागणी केली. पण याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. आता यावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number