माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. सोबतच महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई […]

माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईच्या आग्रीपाडा पोलीस चौकीत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.

सोबतच महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर मुंबईच्या महापौर होत्या. ईडीने २१ जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपये रोकड, १५० कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय १५ कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती.

ईडीने मारलेल्या छाप्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह १० ते १५ जणांचा समावेश होता. दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number