खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या वादावादी नंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे यांच्यासह 35 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.. तर आमदार शिवेंद्रराजे याच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.. दोन्ही गटाकडून एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे..
उदयनराजेंसह कार्यकर्त्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन 2 लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विक्रम पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीमध्ये संशितांमध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा समावेश आहे. बेकायदा जमा जमवणे दमदाटी करून नुकसान करणे यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.