Sangli Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते अन् वाटेत असं काही घडलं की; आई आणि मुलाचा जागीच मृत्यू, 6 जण….

काल राज्यांमध्ये काही तासांच्या अंतराने भीषण दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरपूरात देवदर्शनासाठी जाणाऱ्या पलूस येथील भोसले कुटुंबीयांवर काळाचा घात आहे.

Sangli Accident : पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते अन् वाटेत असं काही घडलं की; आई आणि मुलाचा जागीच मृत्यू, 6 जण….

कालपासून अपघातांच्या अनेक बातम्यांनी राज्याला हादरवून ठेवलं आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये काही तासांच्या अंतराने भीषण दुर्घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरपूर देवदर्शनासाठी जाणाऱ्या पलूस येथील भोसले कुटुंबीयांच्या कारचा जुनोनी जवळ भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत संदीप भोसले आणि त्यांच्या मातोश्री यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर कारमधील अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा- Nashik : भोंदूगिरी करणाऱ्या आणखी एका बाबाचा भांडाफोड; अंधश्रद्धेच्या नावाखाली पैशांची लूट करणाऱ्या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी पलूस येथील रहिवासी आणि व्यावसायिक असलेले संदीप भोसले (वय 28) आणि त्यांच्या आई रेखा भोसले (वय 52) हे आपल्या संपूर्ण कुटुंबीयांसह कारने विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत वाहनामध्ये आई, पत्नी (पूजा भोसले), भाऊ (अनिल भोसले), भावजय (विद्या भोसले), लहान मुले असे कुटुंबातील एकूण आठ सदस्य होते.

त्यांची कार जुनोनी गावाजवळ आली असता, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात संदीप भोसले आणि त्यांच्या आई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, इतकचं नव्हे तर ते गाडीच्या बाहेर देखील फेकले गेले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान या अपघाताबबात परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number