Uttar Pradesh Accident : प्रभू श्रीरामाचे दर्शन करून निघाले अन्… महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला

वाराणसीमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन जाणारी महाराष्ट्रातील भाविकांचा भीषण अपघात झाला आहे

Uttar Pradesh Accident : प्रभू श्रीरामाचे दर्शन करून निघाले अन्… महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातून एक दु:खद घटना समोर आली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन जाणारी महाराष्ट्रातील भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. ही बस अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन नेपाळच्या दिशेने जात होती. त्यावेळेस वाराणसी-गोरखपूर महामार्गावर नादगंज जवळील नवसारा येथे भाविकांच्या बसचा दुर्दैवी अपघात झाला. दरम्यान या अपघातात बुलढाणा आणि अकोल्यातील भाविक जखमी झाले आहेत तर काहींची जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे आणि परिसरातील 38 भाविक तीर्थयात्रेसाठी गेले होते. अपघातात बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी अयोध्या आणि वाराणसीचे दर्शन पूर्ण करून भाविकांनी भरलेली ही बस नेपाळ काठमांडूच्या दिशेने जात होती. त्यावेळेस नवसारा परिसरात समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगवर जोरदार धडकली.

हेही वाचा- Tuljabhavani Temple: तुळजाभवानी चरणी भक्ती विसरून 'शक्ती'चा गैरवापर; राडा करणाऱ्या 10 भाविकांना दोन वर्षे प्रवेश बंदी

घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांनी बचावकार्य सुरु केले. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. यात मृतांची आणि जखमींची ओळख पटली असून सरस्वती पाखरे (रा. रोहिनखेड, जि. बुलढाणा) आणि अन्नपूर्णाबाई (जि. अकोला) या दोन ज्येष्ठ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोन्ही पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आहे. तर इतर 35 जखमींना स्थानिक गाझीपूर सिव्हिल रुग्णालयाला दाखल करण्यात आले. या भीषण अपघातामुळे बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number