सध्या देशात अनेक ठिकाणी मान्सून धडकला असून मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी वादळी पावसाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. भीषण वादळामुळे उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात धक्कादायक दुर्घटना घडली आहे. चक्क काम सुरू असलेला पुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घटली आहे. यात 6 मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हमीरपूरमध्ये सध्या पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादळामुळे पुलाचा भलामोठा सांगाडा थेट मजुरांवर पत्त्यांसारखा कोसळला. यावेळी आतापर्यंत 6 मजूर दगावले असून इतर मजूरांचा शोध सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे
हेही वाचा- Wardha Rain : वर्ध्यात अवकाळीचा कहर! 300 कोंबड्या ठार, बैलजोडीवर वीज, एका झटक्यात लाखोंच नुकसान…
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अॅक्शन मोडवर
या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ट्वीट करत माहिती दिली की, “हमीरपूर जिल्ह्यातील बेटवा नदीवर झालेल्या भीषण अपघातातील जीवितहानी अत्यंत हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांप्रति माझ्या संवेदना आहेत. एसडीआरएफच्या (SDRF) समन्वयाने मदत आणि बचाव कार्य तातडीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मी भगवान श्रीरामाकडे प्रार्थना करतो की, दिवंगत आत्म्यांना त्यांच्या दिव्य चरणी स्थान मिळो आणि जखमी लवकर बरे होवोत.”
जनपद हमीरपुर में बेतवा नदी पर एक दुर्भाग्यपूर्ण दुर्घटना में हुई जनहानि अत्यंत दुःखद एवं हृदय विदारक है। मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं। जिला प्रशासन को SDRF के साथ मिलकर राहत और बचाव कार्य तेजी से संचालित करने हेतु निर्देश दिए हैं। प्रभु श्री राम से प्रार्थना… — Yogi Adityanath (@myogiadityanath) May 29, 2026
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तत्काळ दखल
यावेळी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, हमीरपूर दुर्घटनेची तात्काळ दखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दुर्घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ पाठवण्याचे आणि मदत व बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचसोबत बचाव कार्य अधिक तीव्र करण्याचे निर्देशही दिले. तर जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मृतांच्या कुटुंबीयांशी थेट संपर्क साधून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
Uttar Pradesh CMO says – The Chief Minister took immediate cognizance of the Hamirpur tragedy. He directed the administration to dispatch senior officials to the accident site immediately and to expedite relief and rescue operations. He also issued directives to intensify relief… https://t.co/YPFgMG2eI0 — ANI (@ANI) May 29, 2026