मोबाइल गेमपायी 19 वर्षीय मुलाची आत्महत्या

मोबाइल गेममुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत असून पुण्यात मोबाइल गेममुळे तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष माळी असे तरुणाचे नाव असून कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथील रहिवासी आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं ? पुण्यातील कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे […]

मोबाइल गेमपायी 19 वर्षीय मुलाची आत्महत्या

मोबाइल गेममुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडत असून पुण्यात मोबाइल गेममुळे तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संतोष माळी असे तरुणाचे नाव असून कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथील रहिवासी आहे. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे मोबाइल गेममुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संतोष माळी असे तरुणाचे नाव असून तो 19 वर्षाचा होता.

आत्महत्या करण्यापूर्वी संतोषने चिठ्ठी लिहिली होती.

या चिठ्ठीमध्ये गेममुळे आत्महत्या केल्याचे संतोषने स्पष्ट केले आहे.

अवर सन विल शाईन अगेन, पिंजऱ्यातील ब्लॅक पॅंथर मुक्त झाला. द एंड असे चिठ्ठीत लिहिले.

सोशल मीडिया अकाऊंटवरही संतोषने बॅल्क पॅंथरचा फोटो ठेवला होता.

संतोष आपल्या आई-वडिल आणि आजीसोबत राहत होता.

संतोषला मोबाइल गेम खेळण्याची प्रचंड हौस होती.

गुरुवार रोजी मोबाइलवर गेम खेळून झाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number