लातूरच्या प्रादेशिक उपायुक्ताच्या आदेशाला समाजकल्याण अधिकाऱ्याकडून केराची टोपली

लातूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपयुक्त अविनाश देवसटवार यांच्या आदेशाला लातूरच्या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केराची टोपी दाखवली.

लातूरच्या प्रादेशिक उपायुक्ताच्या आदेशाला समाजकल्याण अधिकाऱ्याकडून केराची टोपली

अजय घोडके. प्रतिनिधी. लातूर: लातूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपयुक्त अविनाश देवसटवार यांच्या आदेशाला लातूरच्या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केराची टोपी दाखवल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयात जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील अनेक कर्मचाऱ्यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून विविध कामासाठी तोंडी आदेशाने नियुक्त केले आहेत. अशातच, या कर्मचाऱ्यांची मूळ स्थापन असलेल्या आश्रम शाळांमधील कामे मागील दोन ते तीन वर्षांपासून ठप्प झाली आहेत. त्यामुळे या आश्रम शाळांमधील अध्यापन आणि शिशण प्रक्रिया मंदावलेली दिसून येते. 

हेही वाचा: संजय गायकवाड यांना समज द्या; फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

ही गंभीर बाब लक्षात घेऊन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी मागील दोन वर्षांपासून वेळोवेळी आदेश काढून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयातील आश्रम शाळांमधील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र, तरीदेखील उपायुक्त संतोषकुमार नाईकवाडी यांनी आदेशाला न जुमानता आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांकडून अशासकीय काम करून घेत त्यांना वेठीस धरले आहे. त्यामुळे, उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या आदेशाला न जुमानणाऱ्या समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्यावर प्रादेशिक उपायुक्त कार्यालय कोणती कारवाई करणार आहेत का? याकडे जिल्ह्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number