Beed Crime News : बीडच्या परळीत थरारर घटना, पैशाच्या वादातून मध्यरात्री हॉटेल व्यावसायिकावर चाकूने सपासप वार; एक जण ताब्यात तर दुसरा फरार

बीडच्या परळीत मध्यरात्री पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Beed Crime News : बीडच्या परळीत थरारर घटना, पैशाच्या वादातून मध्यरात्री हॉटेल व्यावसायिकावर चाकूने सपासप वार; एक जण ताब्यात तर दुसरा फरार

बीड : बीडच्या परळीत मध्यरात्री पैशाच्या देवाण-घेवाणीतून खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात मर्डर अ‍ॅक्टनुसार या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओमकेश कारभारी आंधळे यांच्या फिर्यादीनुसार मध्यरात्री पैशाच्या देवाण-घेवाणीतून भाजी मार्केट बस स्टँड रोड समोरील खुल्या मैदानात आरोपींनी कारभारी नारायण आंधळे (वय 44) या व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची माहिती आपल्या फिर्यादीमध्ये दिली. त्यानुसार परळी शहर पोलिसांनी तात्काळ 127/26,103(1),3(5) कायद्यानुसार गुन्हा नोंद करत एका आरोपीस ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी हा फरार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पुढील चौकशी परळी शहर पोलीस करत आहे.

हेही वाचा : Manoj Jarange on Devendra Fadanvis: 'मुख्यमंत्री आमच्यासाठी शत्रू नाहीत पण…', देवेंद्र फडणवीसांबद्दल स्पष्टच बोलले मनोज जरांगे

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक कारभारी नारायण आंधळे आणि आरोपी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद सुरू होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास परळी शहरातील भाजी मार्केटसमोरील खुल्या मैदानात याच पैशांच्या कारणावरून त्यांच्यात पुन्हा एकदा जोरदार बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला. संतापलेल्या आरोपींनी कारभारी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने कारभारी आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. या प्रकरणी मृत कारभारी यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मध्यरात्रीच एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या. मात्र, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number