Mumbai Crime : मुंबईत चाकूहल्ल्याचे सत्र सुरुच! विनवण्या करूनही तरुणाच्या पोटात चाकू भोसकून वार

मुंबईत किरकोळ कारणावरून चाकूहल्ल्यांच्या घटना सुरूच आहेत. लोकलमधील 22 वर्षीय मयंक हत्येनंतर आता माहिममध्ये तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला आहे.

Mumbai Crime : मुंबईत चाकूहल्ल्याचे सत्र सुरुच! विनवण्या करूनही तरुणाच्या पोटात चाकू भोसकून वार

मुंबईत किरकोळ कारणावरून चाकूहल्ल्यांच्या घटना सुरूच आहेत. लोकलमधील 22 वर्षीय मयंक हत्येनंतर आता माहिममध्ये तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला आहे. धक्का लागून मोबाईल खाली पडल्याच्या वादातून 35 वर्षीय नवीन प्रसन्ना याच्यावर चाकूने हल्ला केला आहे. ही घटना गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास माहिममध्ये घडली आहे. माहिम पश्चिम भागात असलेल्या पितांबर लेन भागात राहायला असलेला नवीन गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास लोअर परळ येथील ऑफिसमधून काम आटोपून घरी परतत होता.

नवीन प्रसन्ना हा लोअर परळ येथील कार्यालयात ऑफिस बॉय म्हणून कार्यरत आहे. माहिम स्टेशनबाहेर जात असताना नवीनचा अज्ञात व्यक्तीला धक्का लागला. त्यानंतर आरोपीने मोबाईल नुकसान भरपाईची मागणी केली. परंतु नवीनने पैसे देण्यास नकार दिला. नवीन सतत सॉरी बोलून देखील हल्लेखोराने रागाच्या भरातून नवीनवर चाकू काढून वार केले. वादानंतर आरोपीने पोटात चाकू भोसकून घटनास्थळावरून पलायन केले.

हेही वाचा- Pune Nasrapur Crime : मोठी बातमी! 2 महिन्यात चिमुरडीला न्याय मिळाला; नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

रक्तबंबाळ झालेला नवीन त्याच अवस्थेत जमीनीवर कोसळला. सध्या जखमी नवीनवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर माहिम पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे. या घटनेने मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. 
बोरीवली 

नुकताच काही दिवसांपूर्वी मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 22 वर्षीय मयंक लोहारची आरोपी रोशन सुवर्णा याने लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून हत्या केली. यानंतर आरोपीला मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली आहे. रोशन सुवर्ण असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी रोशनला पाच दिवसांची पोलिस को आहे. तसेच रोशन विरोधात पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवले असून काही गोष्टींचा सुगावा पोलिसांना लागला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number