जुन्या वादातून २६ वर्षीय युवकाचा खून

नांदेड १९.जुलै.२०२३: नांदेड शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एकदा जुन्या प्रेम प्रकरणातून एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री ११ वाजता या तरुणाचा खून करण्यात आला. या घटने संबंधित चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती इतवारा पोलिसांनी दिली आहे. किरण माने यांचे रंजनाबाई एडके यांच्या मुलीसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमसंबंध […]

जुन्या वादातून २६ वर्षीय युवकाचा खून

नांदेड १९.जुलै.२०२३: नांदेड शहरात खुनाचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एकदा जुन्या प्रेम प्रकरणातून एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री ११ वाजता या तरुणाचा खून करण्यात आला. या घटने संबंधित चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती इतवारा पोलिसांनी दिली आहे.

किरण माने यांचे रंजनाबाई एडके यांच्या मुलीसोबत दोन वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यावरून रंजना बाई, यांचे किरण माने यांच्यासोबत वाद झाले. या वादातून दुष्मनी निर्माण झाली होती. या कारणावरून किरण भास्कर माने यांना शिवा माने व अविनाश भाऊ नंदाने यांनी बोलावून घेवून खंजीरने छातीवर, पोटावर, मानेवर अनेक वार करून खून केला आहे, असे किरण माने यांची पत्नी प्रतिभा माने यांनी तक्ररीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रतिभा माने यांच्या फिर्यादीवरून, इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरु केली आहे.

किरण भास्करराव माने यांच्या खून प्रकरणी प्रतिभा किरण माने यांनी पोलीसात तक्रार दिली. किरण माने हे मजुरी करून कुटुंबाची उपजिविका भागवत होते.
आरोपी शिवा माने याच्यावर विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. नांदेड शहरात दिवसेंदिवस खून, दरोडे, गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number