राज्यात शुक्रवारी ९,६७७ नवे कोरोना रुग्ण

राज्यात शुक्रवारी ९,६७७ नवे कोरोनाबाधित आढळले असून १५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर कोरोनातून बरे होऊन १० हजार १३८ रुग्ण घरी परतले. राज्यात दिवसभरात रायगड ४८१, नगर ३५०, पुणे जिल्हा ६०७, पुणे शहर २७६, पिंपरी-चिंचवड २१४, सातारा ७८४, कोल्हापूर १६७२, सांगली ७८४, रत्नागिरी ४८७ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ही सध्या १ लाख […]

राज्यात शुक्रवारी ९,६७७ नवे कोरोना रुग्ण

राज्यात शुक्रवारी ९,६७७ नवे कोरोनाबाधित आढळले असून १५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर कोरोनातून बरे होऊन १० हजार १३८ रुग्ण घरी परतले. राज्यात दिवसभरात रायगड ४८१, नगर ३५०, पुणे जिल्हा ६०७, पुणे शहर २७६, पिंपरी-चिंचवड २१४, सातारा ७८४, कोल्हापूर १६७२, सांगली ७८४, रत्नागिरी ४८७ नवे रुग्ण आढळले. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या ही सध्या १ लाख २० हजार ७१५ आहे.

मुंबईत शुक्रवारी ६९३ रुग्णांचे नव्याने निदान झाले असून २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३०,८९८ चाचण्या झाल्या असून यात ६९३ रुग्ण नव्याने आढळले आहेत, तर ५७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. प्रतिदिन बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या शुक्रवारी पुन्हा वाढलेली दिसून आली.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली.. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number