यंदाचा 90वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा….

वृत्तसंस्था, नवी दिल्ली जगातील मानाचा पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यंदा 90 वे एकॅडमी एवॉर्डस अर्थात ऑस्कर पुरस्कार दिले जाताहेत. बरोबर 88 वर्षांपूर्वी 16 मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता. यंदाचा मुख्य कार्यक्रम लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये सोमवारी पहाटे 5 वाजल्यापासून सुरु आहे. हॉलिवूड अभिनेता जिम्मी किमेल यंदा ऑस्कर […]

यंदाचा 90वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा….

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जगातील मानाचा पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यंदा 90 वे एकॅडमी एवॉर्डस अर्थात ऑस्कर पुरस्कार दिले जाताहेत. बरोबर 88 वर्षांपूर्वी 16 मे रोजी पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा संपन्न झाला होता. यंदाचा मुख्य कार्यक्रम लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये सोमवारी पहाटे 5 वाजल्यापासून सुरु आहे. हॉलिवूड अभिनेता जिम्मी किमेल यंदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचलन करत आहेत. यात रेड कार्पेटपासून ते मेकअप आर्टीस्ट आणि बॅकस्टेजपासून ते विजेत्यांपर्यंतची सर्व तयारी पूर्णत्वाला आलीये.

ऑस्कर ट्रॉफीची वैशिष्टये

अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड फॉर मेरिट या अधिकृत नावानं सन्मानचिन्हाची ओळख आहे.

ऑस्कर ट्रॉफी ब्रिटॅनिअम धातूपासून तयार केली जाते.

क्रुसेडर्स तलवार घेऊन उभ्या असलेल्या सरदाराची मूर्ती असते.

ऑस्कर ट्रॉफीची उंची 34 सेंमी तर वजन 3.85 किग्रॅ असतं.

ट्रॉफीची सन्मानचिन्हाच्या पायाखाली 5 ‘स्पोक’दिसतात.

हे 5 स्पोक लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, तंत्रज्ञ यांचं प्रतिनिधित्व करतात.

कलादिग्दर्शक सेड्रिक गिबन्स, जॉर्ज स्टॅन्लेने यांनी ऑस्कर डिझाइन केलं.

यंदा ऑस्करच्या शर्यतीत गईलर्मो डेल टोरोच्या ‘द शेप ऑफ वॉटर’ या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे 13 विभागात नामांकनं मिळाली आहेत. याआधी ‘ऑल अबाऊट इव’, ‘टायटॅनिक’ आणि ‘ला ला ला लॅन्ड’ या चित्रपटांना सर्वाधिक नामांकनं मिळाली होती.

‘मडबाऊंड’ या चित्रपटाला 5 विभागात, तर ‘गेट आऊट’ या चित्रपटाला 4 विभागात नामांकनं मिळाली आहेत.

आतापर्यंत जाहीर झालेले पुरस्कार

सर्वोत्कृष्ट संकलन – डंकर्क

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर – कोको

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म – डिअर बास्केटबॉल

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अॅलिसन जॉने (आय, टॉन्या)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – सॅम रॉकवेल- (थ्री बिलबोर्डस आऊटसाईड ईबिंग)

सर्वोत्कृष्ट परभाषिक चित्रपट – अ फँटॅस्टिक वुमन (चिली)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सेट डेकोरेशन – द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण – डंकर्क

सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन – डंकर्क

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री फिचर – इकरस

सर्वोत्कृष्ट वेशभूषा – फॅन्टम थ्रेड

सर्वोत्कृष्ट रंगभूषा, केशभूषा – डार्केस्ट अवर

महत्त्वाच्या पुरस्कारांची नामांकनं

सर्वोत्कृष्ट चित्रपट

कॉल मी बाय युअर नेम
गेट आऊट
डार्केस्ट अवर
डंकर्क
द पोस्ट
थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी
फँटम थ्रेड
द शेप ऑफ वॉटर
लेडी बर्ड

 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
ख्रिस्तोफर नोलान (डंकर्क)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मार्गो रॉबी (आय टोन्या)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट अवर)
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

 

oscar-2018.jpg

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number