जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुलुंड आणि नाहूरमधील रेल्वेच्या यार्डनजीक शनिवारी सायंकाळी सर्पमित्रांनी एका अजगराला जीवनदान दिले. हा अजगर मुलुंड- गोरेगाव रोडजवळ एका वाहनातल्या प्रवाशाला आढळला.
त्यानं सेव्ह वाइल्डलाइफ ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना याची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्रांनी घटनास्थळी जाऊन अजगराचा शोध घेतला आणि त्याला वाचविले.
हा अजगर इंडियन रॉक पायथॉन या प्रजातीचा असून त्याची लांबी साडेनऊ फूट आहे.