बाजारात 80 टक्के आंबा केमिकलयुक्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई उन्हाळा सुरु झाल्यावर सर्वांना ओढ लागते ती म्हणजे आंब्यांची. पण तुम्ही खात असलेल्या आंबा हा केमिकल मिश्रित तर नाही ना?. कारण राज्यात अनेक ठिकाणी केमिकल वापरून आंबा पिकवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. यासंदर्भात नाशिकच्या बाजार समितीतील परिस्थितीचा आढावा ‘जय महाराष्ट्र’नं घेतलाय. यात तब्बल 80 टक्के आंबा हा केमिकल वापरून पिकवत असल्याची […]

बाजारात 80 टक्के आंबा केमिकलयुक्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उन्हाळा सुरु झाल्यावर सर्वांना ओढ लागते ती म्हणजे आंब्यांची. पण तुम्ही खात असलेल्या आंबा हा केमिकल मिश्रित तर नाही ना?. कारण राज्यात अनेक ठिकाणी केमिकल वापरून आंबा पिकवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. यासंदर्भात नाशिकच्या बाजार समितीतील परिस्थितीचा आढावा ‘जय महाराष्ट्र’नं घेतलाय.

यात तब्बल 80 टक्के आंबा हा केमिकल वापरून पिकवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. आंब्यावर केमिकलचा वापक करून आंबा नाशिकच्या बाजार समितीत दाखल होत असल्याचे एका व्यापाऱ्याकडूनचं माहिती मिळालीय. त्यामुळे नागरिंकांनी हा आंबा खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुम्ही खात असलेला हा आंबा केमिकल मिश्रित नाही ना?.

असा सवाल ‘जय महाराष्ट्र’ करत आहे. या आंब्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. केमिकलमुळे आंबा लवकर पिकतो आणि त्यातून चांगले पैसे ही मिळतात. 80 टक्के आंबा केमिकलने पिकवला जातो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number