जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
रस्ता रुंदीकरणाच्या कामाला विरोध करणाऱ्या एका वृद्ध महिलेला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडलीय. आमरावती चव्हाण असे या महिलेचे नाव असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साताऱ्यात कराड-चिपळूण रस्ता रुंदीकरणाचे काम काही महिन्यांपासून सुरु आहे. या रस्त्याच्या कामासाठी काही जमिनी प्रशासनाने भाडे तत्त्वावर घेतल्या होत्या. त्यात आमरावती चव्हाणं यांचे शेतातील घरही येत होतं. मात्र, त्यांनी घराची जमीन देण्यास विरोध केला.
तरीही काही दिवसांत त्या भागात रस्त्याचे काम सुरु झालं. याविरोधात अमरावती चव्हाण यांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सुरुवात केली. अखेर त्यांच्या तक्रारींना वैतागून आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी 29 मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आमरावती यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले.