देशात गेल्या २४ तासांत ७२४० नवे रुग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोन रुग्णांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ७ हजार २४० कोरोना रुग्ण आढळले असून बुधवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, एकाच दिवसात कोरोना रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ […]

देशात गेल्या २४ तासांत ७२४० नवे रुग्ण

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. तर महाराष्ट्रात कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोरोन रुग्णांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये ७ हजार २४० कोरोना रुग्ण आढळले असून बुधवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्या २ हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, एकाच दिवसात कोरोना रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ झाली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बुधवारी राज्यात २ हजार ७०१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ९ हजार ८०६ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे मुंबईत १ हजार ७६५ कोरोना रुग्ण आढळल्यामुळे प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. देशात गेल्या २४ तासांत ७ हजार २४० नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ३२ हजार ४९०वर पोहचली आहे.

मागील २४ तासांमध्ये राज्यात एकाही कोरोना रुग्णांची नोंद झाली नाही. तसेच दिवसभरात १ हजार ३२७ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले असून बरे झालेल्यांची संख्या ७७ लाख ४१ हजार १४३ इतकी झाली आहे. तर, राज्यातील मृत्यूदर हा १.८७ टक्के इतका आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number