जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. तसंच प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
आता मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. औद्योगिक शहर असणाऱ्या मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचा उल्लेख या आकडेवारीत आहे.
मुंबईतही शेकडो शेतकरी शेती करीत असून राज्य सरकारच्या कर्जमाफीचा फायदा या शेतकऱ्यांना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत मुंबईतील 813 शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे. यामध्ये मुंबई शहरातील 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगरातील 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे.