मोडक-सागर तलावात ६८.०६ टक्‍के एवढा पाणीसाठा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा गुरूवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या […]

मोडक-सागर तलावात  ६८.०६ टक्‍के एवढा पाणीसाठा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका दररोज सुमारे ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नागरिकांना केला जातो. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर तलाव हा गुरूवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील चौथा तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सर्व तलावांमध्‍ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्‍ये ९८,५१३ कोटी लीटर (९,८५,१३० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ६८.०६ टक्‍के एवढा पाणीसाठा आहे.
यंदाच्‍या पावसाळयात तुळशी तलाव हा भरून वाहू लागलेला पहिला तलाव ठरला आहे. विहार तलाव आणि तानसा तलाव हे बुधवारी, दिनांक २६ जुलै रोजी भरून वाहू लागले आहेत. तर, काल रात्री उशिरा भरून वाहू लागलेल्‍या मोडक-सागर तलाव हा यंदाच्‍या मोसमातील भरून वाहू लागलेला चौथा तलाव ठरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number