Nasrapur Case Verdict Update : नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाने निर्णय राखून ठेवला, 29 जून रोजी देणार अंतिम निकाल

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे, महाराष्ट्रदिनी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी फास्ट्रॅकवर खटला चालवण्यात आला असून आज, गुरुवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, कोर्टात दोन्ही बाजूनच्या वकिलांनी युक्तिवाद केला असून कोर्टात नराधम दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी कोर्टाने निर्णय राखून ठेवला […]

Nasrapur Case Verdict Update : नसरापूर अत्याचार प्रकरणी कोर्टाने निर्णय राखून ठेवला, 29 जून रोजी देणार अंतिम निकाल

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 1 मे, महाराष्ट्रदिनी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी फास्ट्रॅकवर खटला चालवण्यात आला असून आज, गुरुवारी या खटल्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, कोर्टात दोन्ही बाजूनच्या वकिलांनी युक्तिवाद केला असून कोर्टात नराधम दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. याप्रकरणी कोर्टाने निर्णय राखून ठेवला असून येत्या 29 जून रोजी न्यायालय आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आरोपीला फाशी होणार की जन्मठेप, या निर्णयासाठी आणखी 4 दिवस वाट पहावी लागणार आहे. 

हेही वाचा : Mumbai Crime : मित्राकडून दोन चाकू घेतले, छातीवर आणि पोटावर सपासप वार, डोळ्यावर ठोसा; लोकलमध्ये काय घडलं?; आरोपीने सांगितलं जसंच्या तसं

राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (वय 65) याला अटक करण्यात आली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस. आर. साळूंखे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आहेत. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतुद आहे. तर एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षाच्या कारावासाची शिक्षेची तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. दरम्यान, न्यायाधीशांनी, तू तो प्रसंग आठव आणि तुच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे, असे आरोपीला विचारले. त्यावर आरोपी भिमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितले की, “मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number