‘ही’ 6 फुटी कोल्हापुरी चप्पल ठरतेय आकर्षणाचं केंद्र

कोल्हापूरी चपलेची चर्चा जगभर असली तरी ठाण्यात सध्या एक सहा फूटी कोल्हापूरी चप्पल चांगलीच गाजते आहे. ठाण्यातील एका कारागिराने तब्बल 6 फूटी कोल्हापूरी चप्पल स्वत:च्या हाताने तयार केली. नवरात्रीच्या प्रारंभापासून  ही चप्पल सर्वाना पहायला मिळणार असून या चपलेसोबत सेल्फी घेण्याची संधीही मिळणार आहे. ठाण्यातील अंकुश कारंडे यांनी बनविलेल्या या चपलेचा सर्वत्र कौतुक होत आहे कोल्हापूरच्या […]

‘ही’ 6 फुटी कोल्हापुरी चप्पल ठरतेय आकर्षणाचं केंद्र

कोल्हापूरी चपलेची चर्चा जगभर असली तरी ठाण्यात सध्या एक सहा फूटी कोल्हापूरी चप्पल चांगलीच गाजते आहे. ठाण्यातील एका कारागिराने तब्बल 6 फूटी कोल्हापूरी चप्पल स्वत:च्या हाताने तयार केली. नवरात्रीच्या प्रारंभापासून  ही चप्पल सर्वाना पहायला मिळणार असून या चपलेसोबत सेल्फी घेण्याची संधीही मिळणार आहे. ठाण्यातील अंकुश कारंडे यांनी बनविलेल्या या चपलेचा सर्वत्र कौतुक होत आहे

कोल्हापूरच्या प्रसिद्ध कोल्हापूरी चप्पलची ट्रेंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असून मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये अशा चपला बहुदा राजकारण्यांच्या पायात दिसतात. मात्र, या चपला तरूणांमध्येही आकर्षणाचा विषय ठरावा म्हणून ठाण्यातील टेंभीनाका भागात राहणारे, अंकुश कारंडे यांनी तब्बल 6 फुट चप्पल तयार केली आहे. विशेष म्हणजे, ही चप्पल त्यांनी अवघ्या 15 दिवसांमध्ये तयार केली आहे. अंकुश यांचे वडीलोपार्जित चपला तयार करण्याचा शॉप ठाण्यात आहे.

एके दिवशी इतकी मोठी चप्पल बनविण्याचा विश्वास त्यांनी मनाशी बाळगला होता. सुरूवातीला त्यांनी ऑगस्ट महिन्यात चपलेचे चित्र बनविले.

चपलेसाठी लागणाऱ्या सामुग्रीची जुळवाजुळव केली. रेशीम, धागा, चामडे, गोंद, रबरी सोल यासारख्या वस्तू आणल्या.

त्यानंतर सप्टेंबरपासून त्यांनी या चप्पल बनविण्याचे काम सुरू केले आणि अवघ्या 15 दिवसांमध्येच त्यांनी या चपलेचे काम पूर्ण केले.

या चपलेसाठी त्यांनी तब्बल 25 हजार रुपये खर्च केले.

सर्वांनी वापर करावा यासाठी सदरची चप्पल तयार केल्याचे कारंडे यांनी सांगितलं आहे. ही चप्पल नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. ही चप्पल पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number