अहिल्यानगर येथील राहाता तालुक्यातील लोणी येथे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक समोर आली आहे. ज्यात 58 वर्षीय संजय योसेफ पंडित नावाच्या फादरने चर्चसमोरील मैदानात खेळत असलेल्या 9 वर्षीय पीडित चिमुरडीला जवळ बोलावून बळजबरीने तिच्यावर अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून लोणी पोलिसांनी आरोपी फादर संजय पंडित याच्या विरुद्ध विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यास ताब्यात घेत राहाता न्यायालयात हजर करण्यात आले असून. सफर प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत.
दरम्यान श्रीरामपूर विभागातील अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “29 जून रोजी सायंकाळी राहाता तालुक्यातील लोणी येथे एक 9 वर्षाची अल्पवयीन मुलगी बाहेर खेळत असताना तिथेच बाजूला राहणाऱ्या संजय पंडित नावाच्या या व्यक्तीने त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे.
त्यानंतर या घटनेची तक्रार लोणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे. त्यानंतर कलम 74, 75 त्याचप्रमाणे पोक्सो अॅक्ट प्रमाणे 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अंतर्गत आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून जी अल्पवयीन मुलगी आहे, बालकल्याण समितीपुढे स्टेटमेंट घेण्यात आले आहे. दरम्यान या आरोपीचो दोषपत्र येत्या 5 ते 6 दिवसात न्यायालयात दाखल करण्यात येणार आहेत.”