#VotingRound2 महाराष्ट्रात 10 मतदारसंघांमध्ये 57 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले असून देशातील 12 राज्यांमधील 95 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु होते. महाराष्ट्रातील 10 जागांसाठी मतदान पार पडले असून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यातील 10 मतदारसंघांमध्ये सरासरी 57.22 टक्के मतदान झाले. अकोलामध्ये 54.32%, अमरावतीमध्ये 52.66%, बीडमध्ये 46.29%, बुलडाण्यात 57.10%, हिंगोलीमध्ये 56.22% मतदान झाल्याचे समजते आहे. तसेच लातूरमध्ये 56.68%,  नांदेडमध्ये 61%, उस्मानाबादमध्ये 56.87%, परभणीत 55.13% आणि सोलापूरमध्ये 41.47% मतदान झाले. […]

#VotingRound2  महाराष्ट्रात 10 मतदारसंघांमध्ये 57 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले असून देशातील 12 राज्यांमधील 95 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु होते. महाराष्ट्रातील 10 जागांसाठी मतदान पार पडले असून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राज्यातील 10 मतदारसंघांमध्ये सरासरी 57.22 टक्के मतदान झाले. अकोलामध्ये 54.32%, अमरावतीमध्ये 52.66%, बीडमध्ये 46.29%, बुलडाण्यात 57.10%, हिंगोलीमध्ये 56.22% मतदान झाल्याचे समजते आहे. तसेच लातूरमध्ये 56.68%,  नांदेडमध्ये 61%, उस्मानाबादमध्ये 56.87%, परभणीत 55.13% आणि सोलापूरमध्ये 41.47% मतदान झाले.

दिवसभरातील अपडेट –

दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

नांदेडमध्ये सर्वात जास्त मतदान झाले आहे.

कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही मतदान केले.

तसेच अनेक दिग्गज कलाकारांही मतदान केले आहे.

स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

अमरावतीमध्ये एका युवकाने लग्न करण्यापूर्वी मतदान केले आहे.

नांदेडमध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

राज्यातील 10 मतदारसंघांमध्ये सरासरी 57.22 टक्के मतदान झाले.

तसेच देशभरात सहा वाजेपर्यंतची टक्केवारी –

आसाम – 73.32%
बिहार – 58.14%
छत्तिसगड – 68.70%
जम्मु काश्मीर – 43.37%
कर्नाटका – 61.80%
महाराष्ट्र – 55.37%
मणीपुर – 74.69%
ओडीसा – 57.41%
पुदुचेरी – 72.40%
तामिळ नाडू – 61.52%
उत्तर प्रदेश – 58.12%
पश्चीम बंगाल – 75.27%

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number