श्रावणात विश्वविक्रमी 505 फुटांची कावड

श्रावण मासानिमित्त औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने विश्वविक्रमी तब्बल 505 फुटांची ‘हर हर महादेव कावड यात्रा’ काढण्यात आली. हर्सुल येथील हरसिध्दी माता मंदिरातून सकाळी या यात्रेला सुरूवात झाली. त्यानंतर कुंडातील जलकलश घेऊन टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, चेलीपूरा, गांधी पुतळा, सराफा, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, संभाजीपेठ, नागेश्‍वरवाडी मार्गे खडकेश्‍वर येथील महादेव मंदिरात ही कावड यात्रा पोहचली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख […]

श्रावणात विश्वविक्रमी 505 फुटांची कावड

श्रावण मासानिमित्त औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या वतीने विश्वविक्रमी तब्बल 505 फुटांची ‘हर हर महादेव कावड यात्रा’ काढण्यात आली. हर्सुल येथील हरसिध्दी माता मंदिरातून सकाळी या यात्रेला सुरूवात झाली.

त्यानंतर कुंडातील जलकलश घेऊन टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, चेलीपूरा, गांधी पुतळा, सराफा, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, संभाजीपेठ, नागेश्‍वरवाडी मार्गे खडकेश्‍वर येथील महादेव मंदिरात ही कावड यात्रा पोहचली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि दयाराम बसैय्ये यांच्या संकल्पनेतून ही कावड यात्रा काढण्यात आली.

गेल्या वर्षी विश्‍वविक्रमी १५१ फूट कावड यात्रा काढण्यात आली होती. त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. या कावड यात्रेसोबत एक विशेष रथ तयार करण्यात आला आहे. या रथाद्वारे शहरातील 58 महादेव मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number