‘शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी’

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार किल्ले रायगडावर दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा, या प्राधिकरणाच्या अध्यपदाची जबाबदारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सोपवली. तसेच कोस्टल रोडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. […]

‘शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी’

मुंबई, ३ जून २०२३, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५०वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार किल्ले रायगडावर दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा, या प्राधिकरणाच्या अध्यपदाची जबाबदारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर सोपवली. तसेच कोस्टल रोडला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी केलेली शिवसृष्टी उभारण्याची मागणी मान्य करून त्यासाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव विशेष संदेशातून केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपले आमदार भरत गोगावले यांनी किल्ले रायगडाच्या खाली शिवसृष्टीसाठी जी ४५ एकर जागा आहे, त्याची मागणी केली होती. त्याला उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांनी शिफारस केली. तिजोरीच्या चाव्या तर तुमच्याकडेच आहेत. त्यामुळे भरत शेठ तुमची मागणी मान्य. या शिवसृष्टीला ५० कोटी देण्याचा निर्णय आज आपण घेतोय. ही शिवसृष्टी उभारण्यासाठी पैसे कमी पडणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने, त्याच्या प्रेरणेने त्यांच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार हाकतोय. म्हणून शिव छत्रपतींच्या स्वप्नातील शिवसृष्टी आपण याठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करु या, हे देखील मी याठिकाणी सांगू इच्छितोय. शिव छत्रपतींच्या स्वप्नातला सुखी, समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र घडवूया हीच आपण शिवचरणी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number