‘बंडखोर आमदारांना ५० खोकी पचणार नाहीत’

शिवसेनेतील आमदारांनी आता भाजपासोबत युती केली आहे. असेल असताना आमदारांकडून बंडाच्या निर्णयाबाबत वेगवेगळी कारणेही सांगितली गेली आहेत. मात्र, जनतेचा विकास आणि मतदार संघात विकास कामासाठी निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे हा वेगळाच असल्याचा घणाणात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार यांच्यावर केला आहे. गुलाबराव पाटलांचा तर गुलाबराव असेल म्हणत त्यांना ते […]

‘बंडखोर आमदारांना ५० खोकी पचणार नाहीत’

शिवसेनेतील आमदारांनी आता भाजपासोबत युती केली आहे. असेल असताना आमदारांकडून बंडाच्या निर्णयाबाबत वेगवेगळी कारणेही सांगितली गेली आहेत. मात्र, जनतेचा विकास आणि मतदार संघात विकास कामासाठी निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे हा वेगळाच असल्याचा घणाणात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार यांच्यावर केला आहे. गुलाबराव पाटलांचा तर गुलाबराव असेल म्हणत त्यांना ते देण्यात आलेले ५० खोके कधीच पचरणार नाहीत. असेही संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेने सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्व उभे केले. त्याचाच विसर जर यांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील यांना माफ करणार नाहीत.

नाशिक येथे पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी दाखल झालेल्या संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे. बंडखोर आमदारांनी आता पर्यंत अनेक कारणे दिली आहे. पण, खरं कारण त्यांच्याकडून लपवलं जात आहे. त्यांना निधीची पुर्तता आणि ईडीच्या तावडीतून सुटका मिळाल्याने बंडखोर आमदारांनी हे कृत्य केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. आता हे बंडखोर आमदार शिवसेनेला आणि संजय राऊताला जबाबदार घरत आहेत. याची कारणे वेगळीच आहेत ती अजुन समोर आलेली नाही. हे सर्व पैशासाठी केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केला आहे.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number