जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलीय. साडे पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्य़ात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास विक्रोळी पोलिसांनी अटक केलीय. विक्रोळीचं टागोरनगर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय. पीडितेच्या वडीलांच्या मित्रानंच हा प्रकार केल्याचं समोर येतंय.
दरम्यान, चिमुरडीने या अत्याचाराची माहिती आपल्या आईला सांगितल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी आरोपी तौसिफ मोहम्मद खान यास अटक कऱण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.