वृत्तसंस्था, कश्मीर
भारतीय लष्करानी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्याने 5 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं. तर 6 पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याची माहिती मिळते.
बिंबर बट्टल सेक्टरमध्ये लष्कराने ही महत्वाची कारवाई केली. या भागात दहशतवाद्यांना घुसघोरीकरता मदत करण्यासाठी पाकच्या सैन्याने गोळीबार सुरु केला होता.
त्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकचे 5 सैनिक ठार झाले. इतकंच नाही तर सोपोरच्या नाटीपुरा भागात भारतीय लष्कराने घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ठार केलं.