राज्यातील सर्व जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव, तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला अटलबिहारी वायपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा तर, राज्यातील सर्व जनतेला […]

राज्यातील सर्व जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव, तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला अटलबिहारी वायपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा तर, राज्यातील सर्व जनतेला ५ लाखांचा आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा शिंदे-भाजपा सरकारने घेतलेला मोठा निर्णय आहे. या योजनेचा साडेबारा कोटी जनतेला फायदा होणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार आहेत. या योजनेत २ कोटी कार्ड वाटणार असून आता पर्यंत ५ लाखांपर्यत आरोग्य संरक्षण देण्यात आलं आहे. यात मुत्रपिंड शस्र्क्रियेसाठी २.५ लाखांहून आता ४.५ लाखांपर्यंत खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच मागणी नसलेल्या १८१ उपचारांना वगळले, तर मागणी असलेल्या ३२८ उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना तसेच महात्मा फुले जनारोग्य योजनेत १३६५ विकारांवर उपचार केले जाणार आहे. यासाठी १००० रूग्णालयांमध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना महात्मा फुले जनारोग्य योजना लागू केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रात ट्रस्ट स्थापन करणार आहे. दोन्ही योजनांचे एकत्रित कार्ड, पोर्टेबिलिटीचीही सुविधा देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील सीमेलगतच्या ८ जिल्ह्यांत १४० रूग्णालय, तर कर्नाटकातील ४ जिल्ह्यांत १० तसेच राज्यातील आणखी २०० रूग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. यातच स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत उपचार संख्या ७४ वरुन १८४ आणि खर्च मर्यादेत ३० हजारांवरून १ लाख इतकी वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number