पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासाचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. गोरेगाव ते बोरवली स्थानका दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. सिग्नल आणि विद्युत खांबावरील तारांच्या दुरुस्तीसाठी धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो मेगाब्लॉक पाच तासांसाठी घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. बोरिवली आणि गोरेगाव दरम्यान अप-डाऊन दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. गोरेगाव आणि बोरिवली दरम्यानच्या स्लो लाईनवर हा ब्लॉक असेल. मेगा ब्लॉक उद्या सकाळी १०.३५ वाजता सुरु होईल आणि दुपारी ३.३५ वाजता संपेल. ब्लॉक काळात बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावरील सर्व स्लो लाईनवरुन धावणाऱ्या ट्रेन फास्ट लाईनवरुन धावतील. मेगाब्लॉकमुळे उपनगरीय लोकलच्याकाही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द केलेल्या फेऱ्यांची यादी स्टेशन मास्तर कार्यालयात पाहायला मिळेल.