वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

आदित्य नीला दिलीप निमकर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपलंय. वाजपेयी यांचं अमोघ वक्तृत्व, ओघवती भाषाशैली आणि धोरणी नेतृत्त्व यांमुळे ते पक्षातच नव्हे, तर विरोधकांमध्येही लोकप्रिय ठरले. कवितांमध्ये रमणारे वाजपेयी हे जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा मात्र आपल्या कविमनाबरोबरच राजकीय मुत्सद्दीपणाचंही त्यांनी दर्शन घडवलं…  1. एका मताने पडलं सरकार- वजपेयी […]

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

आदित्य नीला दिलीप निमकर

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपलंय. वाजपेयी यांचं अमोघ वक्तृत्व, ओघवती भाषाशैली आणि धोरणी नेतृत्त्व यांमुळे ते पक्षातच नव्हे, तर विरोधकांमध्येही लोकप्रिय ठरले. कवितांमध्ये रमणारे वाजपेयी हे जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा मात्र आपल्या कविमनाबरोबरच राजकीय मुत्सद्दीपणाचंही त्यांनी दर्शन घडवलं…

 1. एका मताने पडलं सरकार-

वजपेयी यांचं पंतप्रधानपद कायमच वादळी ठरलं. ते कधी 13 दिवस, तर कधी 13 महिने आपलं पद राखू शकले. मात्र या काळातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि संन्यस्त वृत्तीने लोकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळेच लोकांच्या मनात वाजपेयींचं स्थान कायमच आदरणीय राहिलं.

 2. पोखरण अणु चाचणी-

11 आणि 13 मे 1998 या दिवसांत भारताने राजस्थानच्या पोखरण येथे 3 यशस्वी अणुचाचण्या केल्या. या काळात अमेरिकेचे उपग्रह सातत्याने भारतातील घडामोडींवर लक्ष ठेवून होते. मात्र या उपग्रहांची नजर चुकवून भारताने अणुचाचण्या यशस्वी करून दाखवल्या. या अणुचाचण्यांमुळे संपूर्ण जगाचा भारताकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला आणि भारत हा अण्वस्त्र शक्ती असणा-या देशांच्या पंक्तीत मानाने बसला.

 3. दिल्ली-लाहोर बस सेवा-

भारत पाकिस्तान संबंधांमध्ये सुधारणा करण्याचा वाजपेयी यांनी मनापासून प्रयत्न केला. वाजपेयी यांच्याच पुढाकाराने दिल्ली-लाहोर बस सेवा सुरू झाली. फेब्रुवारी 1999 मध्ये सुरू करण्यात आलेल्या बस यात्रेत स्वतः वाजपेयी सामील होते. तसंच देव आनंद, जावेद आख्तर यांसारखे दिग्गज कलावंतही त्यांच्यासोबत होते. स्फोटक परिस्थितीमध्ये असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं इतर कोणत्याही पंतप्रधानाला शक्य झालं नसतं, असं खुद्द पाकिस्तानी अधिका-यांनी मान्य केलं. या बससेवेमुळे पाकिस्तानातही वाजपेयी यांची लोकप्रियता वाढली. स्वतः नवाज शरीफ यांनी असं वक्तव्य केलं, की अटल बिहारी पाकिस्तानात निवडणुकीला उभे राहिले, तर येथेही जिंकून येतील.

 4. ऑपरेशन विजय-

वाजपेयी यांनी जरी भारत-पाकिस्तानच्या मैत्रीसाठी पुढाकार घेतला असला, तरी पाकिस्तानच्या दहशती कारवाया थांबत नव्हत्या. जेव्हा पाकिस्तानी सैन्य भारतात घुसखोरी करू लागलं, तेव्हा वाजपेयी यांनी ‘ऑपरेशन विजय’चा नारा दिला. केवळ निंदा करून न थांबता जून 1999 पासून भारतीय लष्कराने कारगीय येथे शत्रूशी युद्ध केलं. 26 जुलै 1999 रोजी भारताने शत्रूचा पराभव करून कारगील येथे तिरंगा फडकावला.

 5. विदेश नीती-

अटल बिहारी वाजपेयी यांचं परदेश नीतीही अत्यंत मुत्सद्दीपणाची होती. चीन, पाकिस्तान, अमेरिका या देशांच्या दबावाला वाजपेयी कधीही बळी पडले नाही. वाजपेयींच्याच कारकीर्दीत चीनने सिक्कीम भारताचा बाग म्हणून मान्य केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 22 वर्षांत पहिल्यांदा भारतात आले. बिल क्लिंटन यांनी 2000 साली 5 दिवसांचा भारत दौरा केला. त्यापूर्वी अणुचाचण्या आणि कारगील युद्धामुळे अमेरिका भारतावर नाराज होती. तसंच भारतावर अनेक निर्बंधही घालण्यात आले होत. मात्र वाजपेयींनी या कोणत्याही गोष्टीला बळी न पडता आपलं धोरण राबवत भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. अखेर अमेरिकेलाही भारतापुढे झुकावं लागलं आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करावे लागले.

वाजपेयींच्याच कारकीर्दीत डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सचं विमान हायजॅक करण्यात आलं. हे प्रकरणही वाजपेयींनी अत्यंत मुत्सद्दीपणे हाताळलं. तसंच 13 डिसेंबर 2001 रोजी भारतीय संसदेवर हल्ला करण्यात आला होता. उत्तराखंड, झारखंड आणि छत्तीसगढ़ या राज्यांची निर्मितीही वाजपेयी यांच्या कारकीर्दीत करण्यात आली. ‘ऑपरेशन विजय’नंतर ‘ऑपरेशन पराक्रम’ही वाजपेयींच्या कारकीर्दीत घडलं. या सर्व घडामोडींदरम्यान वाजपेयींनी आपल्या कुशल नेतृत्वगुणांची छाप पाडली.

निरोप एका युगाला…

वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number