जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नोकिया कंपनीने आपला बहुप्रतिक्षीत नोकिया 6 हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. दमदार इंटरनल मेमरी आणि रॅम हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे.
ब्लॅक आणि सिल्वर अशा दोन रंगांत हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमधे फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कॅपेसिटिव्ह बटनच्या जागेवर फोनमध्ये ऑनस्क्रिन नेविगेशन बटन देण्यात आलं आहे.
मेटल युनिबॉडीसोबत लॉन्च करण्यात आला असून हा तयार करण्यासाठी 6000 सीरिज अॅल्युमिनियम शीटचा वापर करण्यात आला आहे.
32 GB स्टोरेज आणि 4 GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 14,600 रुपये तर 64 GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 16,600 रुपये आहे.
नोकिया 6 चे बेस्ट फिचर्स
– 5.5 इंचाचा फुल एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले, रिझॉल्युशन 1080x1920 पिक्सल
– सुरक्षेच्या दृष्टीने फोनला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे.
– 2.2 गिगाहर्ट्सचं ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर
– 6GB आणि 4GB रॅम
– इंटरनल मेमरी 32 GB आणि 64 GB असून ही मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 GB पर्यंत वाढवता येईल.
– 3000 mAhची बॅटरी
– ड्युअल एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफसोबत 16 MPचा रियर कॅमेरा
– सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी अॅपर्चर एफ/2.0 आणि 84 डिग्री वाईड अँगल लेन्ससोबत 8 MPचा फ्रंट कॅमेरा