जय महाराट्र न्यूज , मुंबई
रिलायंस जिओ आपले युजर्स वाढवण्यासाठी दररोज नवनवीन ऑफर्स जाहिर करते. अशाच प्रकारची आणखी एक ऑफर जिओने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणली आहे.
4G फोन नंतर आता जिओने विद्यार्थ्यांना मोफत वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जिओने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे.
या संपूर्ण योजनेसाठी जिओ राइट्स इश्यू कडून 20 कोटींची मदत घेणार आहे. जिओच्या या योजनेअंतर्गत देशातील 38 हजार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट कनेक्टिविटी मिळणार आहे.
तसेच याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम विद्यालयाच्या आवारात ऑनलाइन पाहता येणार आहे. आणि या सेवेसाठी जिओ हॉटस्पॉट निर्मिती करणार आहे.