जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आजचा दिवस म्हणजे देशाभिमान उंचावणारा दिवस आहे. 16 डिसेंबर 1971मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारताने पाकिस्तानला हरवले होते. त्या दिवसाला आज 46 वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाजी यांनी भारतीय सैन्याचे कमांडर जनरल जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर शरणागती पत्कारली होती.
या युद्धाचा परिणाम म्हणजे पाकिस्तानचा एक भाग त्यांच्यापासून वेगळा झाला आणि बांगलादेश हा नवा देश अस्तित्त्वात आला. या युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दहा हजार सैनिक जखमी झाले होते. या युध्दाची आठवण म्हणून आज देशभर हा दिवस साजरा केला जातो.