भारतीय जनता पक्षाचा गुरुवारी ४४वा स्थापना दिवस आहे. हा दिवस सर्व ठिकाणी साजरा केला जाणार आहे. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त राज्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मुंबईतही स्थापना दिवस साजरा केला जाणार आहे. भाजप प्रदेश कार्यालय येथे चंद्रशेखर बावनकुळे ध्वजारोहन करणार आहेत. तर भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्वजारोहण करणार आहेत. वसंतस्मृती येथे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार ध्वजारोहण करणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला मार्गदर्शन करणार आहेत.