मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुरुवारी वाढदिवस आहे. या निमित्ताने बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला बाळासाहेबांची शिवसेना या पक्षातर्फे ४१ किलोचा मोदक देण्यात आला आहे. तसेच पक्षातर्फे गणपतीची महाआरतीही करण्यात आलेली आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु आज च्या खास प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मुखमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दर्शनासाठी आली. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी आनंद साजरा केला जात आहे. ठाणे जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी बँनरबाजी करण्यात आली आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक लोकांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.