शिक्षण हक्क कायद्यानुसार पंचवीस टक्के आरक्षित जागांवर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज स्वीकारण्यात आले असून राज्यातील सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना बनावट अर्ज भरल्याचे समोर आले आहे. संबंधित बनावट अर्ज बाद करण्याची प्रक्रिया केली जात आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून राज्यातील ९०८८ शाळांमधील १ लाख २ हजार २२ जागांसाठी सुमारे दोन लाख ८५ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात पुण्यातील १५ हजार १३२ जागांसाठी ६३ हजार ११९ प्राप्त झाली आहेत. प्रवेशासाठी प्राप्त अर्ज आणि उपलब्ध अर्ज जास्त असल्याने लॉटरी द्वारे विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे. प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून पुढील आठवड्यात लोटरी द्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. त्यानंतर संबंधित शाळेत जाऊन विद्यार्थ्याला आपला प्रवेश निश्चित करता येणार.
………………