400 साधूंना नपुंसक बनवल्याच्या खटल्यातून बाबा राम रहीमला जामीन

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम 2 साध्वींवरच्या बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगतोय. मात्र 400 साधूंना नपुंसक बनवण्याच्या आरोपातून मात्र सीबीआय विशेष कोर्टात राम रहीमला जामीन मिळाला आहे. बाबा राम रहीमच्या रुग्णालयात आत्तापर्यंत 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र पंचकुला येथील हरयाणाच्या विशेष सीबीआय कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यावर न्यायाधीश जगदीप […]

400 साधूंना नपुंसक बनवल्याच्या खटल्यातून बाबा राम रहीमला जामीन

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम 2 साध्वींवरच्या बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगतोय. मात्र 400 साधूंना नपुंसक बनवण्याच्या आरोपातून मात्र सीबीआय विशेष कोर्टात राम रहीमला जामीन मिळाला आहे.

बाबा राम रहीमच्या रुग्णालयात आत्तापर्यंत 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र पंचकुला येथील हरयाणाच्या विशेष सीबीआय कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यावर न्यायाधीश जगदीप सिंह यांनी सुनावणी केली आणि राम रहीमचा जामीन मंजूर केला.

राम रहीमला जरी या आरोपातून जामीन मिळाला असला तरी राम रहीमची कैदेतून सुटका होणार नाही. राम रहीमचा माजी ड्रायव्हर खट्टा सिंहने राम रहीमबद्दल खुलासा केला होता. यामध्ये राम रहीम करत असलेलं महिलांचं लैंगिक शोषण याचबरोबर साधूंचं लैंगिक खच्चीकरण यांबद्दलही खुलासा करण्यात आला होता.

हंसराज चौधरी या डेरा सच्चा सौधातील एका साधूनेही यासंदर्भात याचिका दाखल केली होती. यामध्ये राम रहीमकडील डॉक्टरांची एक टीम साधूंना प्रार्थनेनंतर नशेच्या गोळ्या देत असल्याचं सांगण्यात आं होतं. नशेच्या गोळ्या घेतल्यावर या साधूंसोबत काय व्हायचं हे कुणालाही समजत नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं.नशेच्या गोळ्या देऊन साधूंना नपुंसक बनवलं जात असल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. याच बरोबर 166 पीडित साधूंची नावंही त्यात देण्यात आली होती. मात्र विशेष सीबीआय न्यायालयातून मात्र राम रहीमला जामीन मिळाला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number