पिंपरी-चिंचवडमध्ये भूतांची भीती दाखवून एका 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
ही धक्कादायक घटना नागसेन परिसरात घडली आहे.
शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलीला भुताची भीती दाखवून आकुर्डी रेल्वे ट्रॅकच्या दिशेने नेलं आणि तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
घरी आल्यावर तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला, त्यानंतर आरोपीवर चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.