जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
मॉर्निंग वॉक हे आरोग्यासाठी केव्हाही चांगलेच ठरते, पण औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेगेल्या 4 जणांच्या ते जीवावर बेतले आहे.
औरंगाबाद शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या चौघाजणांना भरधाव वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जालना रोडवरील केंब्रिज शालेजवळ हा अपघात घडला.
अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. भागिनाथ लिंबाजी गवळी (५६), नारायण गंगाराम वाघमारे (६५), दगडूजी बालाजी ढवळे (६५) आणि अनिल विठ्ठल सोनावणे (४५) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सर्व मृतदेह घाटी रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
स्कॉर्पिओ गाडीतून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून फरार वाहन चालकाचा शोध सुरु आहे.