धाराशीव : राष्ट्रीय महामार्ग 65 वर डाळिंबजवळ सकाळी सहाच्या सुमारास साईप्रसाद पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये कार व सफारीचा समोरासमोर अपघात झाला. विटारा कार KA 38 M9946 बिदर जिल्ह्यातील होती. यामध्ये पाच प्रवासी होते. त्यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही गाडी हैदराबादच्या दिशेने जात होती. तर सफारी Mh 14 EP 0732 सोलापूरच्या दिशेने जात होती. यामधील एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.