मोबाईल दुकानातून ३९ लाख रुपये जप्त

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर सहायक निवडणूक खर्च निरीक्षक व पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पैठण गेट येथील एका मोबाइलच्या दुकानात ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली.

मोबाईल दुकानातून ३९ लाख रुपये जप्त

छत्रपती संभाजीनगर, १२ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर सहायक निवडणूक खर्च निरीक्षक व पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पैठण गेट येथील एका मोबाइलच्या दुकानात ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी चौघांना अटक झाली. डिलक्स मार्केट कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावरील एसएस अॅक्सेसरीज या मोबाइलच्या दुकानात आरोपी काळ्या रंगाच्या बॅगमधून ३९ लाख रुपये घेऊन आले होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे आणि उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांचे पथक हे निवडणूक खर्च निरीक्षकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी चार आरोपी ही रोकड आणि नोटा मोजण्याच्या मशीनसह आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता हवालासाठी ही रक्कम असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्यांनी चौघांना अटक करून रोकड जप्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number