शिवरायांचा प्रतापगड उजळला 358 मशालींच्या तेजाने!

शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा मावळ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला 358 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात चतुर्थीला येथे मशाली पेटवल्या जाऊ लागल्या आणि गेली 8 वर्षं ही परंपरा अखंड सरू आहे.  सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला प्रतापगड किल्ला कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना […]

शिवरायांचा प्रतापगड उजळला 358 मशालींच्या तेजाने!

शिवाजी महाराजांचा आणि त्यांचा मावळ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला 358 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात चतुर्थीला येथे मशाली पेटवल्या जाऊ लागल्या आणि गेली 8 वर्षं ही परंपरा अखंड सरू आहे. 

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेला प्रतापगड किल्ला कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदी मध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून या गडावर तिची स्थापना 1661 मध्ये प्रतापगडावर केली. 

भवानी मातेच्या मूर्ती स्थापनेला 2010 मध्ये 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर 350 मशाली पेटवण्यात आल्या. आता प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये एका मशालीची वाढ होते आहे. यावर्षी 358 मशालींनी किल्ला तेजोमय झाला. ढोल ताशांच्या गजरात या गडावरील पूर्ण तटांच्या बाजूला मशाली पेटवल्या जातात. हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.

नवरात्रातील चतुर्थी दिवशी मशाली पेटविण्याची ही परंपरा सुरु होऊन 8 वर्षं झाली असली तरी हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संखेने आपली हजेरी लावत असतात. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number