जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांसाठी खुशखबर आहे लवकरच साध्या लोकलला एसीचे डब्बे जोडले जाणार आहे. ‘मुंबईतल्या पहिल्या वाहिल्या एसी लोकलची चाचणी यशस्वी ठरली जरी असली तरीही एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये, त्यामुळे साध्या लोकलला एसीचे डबे जोडले जाणार आहेत… अश्या 70 लोकलच्या दररोज 250 ते 300 फेऱ्या चालवल्या जातील’, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी गोरेगाव येथे केली.
‘मुंबईत लवकरच 70 लोकलमध्ये प्रत्येकी तीन डबे एसी करण्यात येणार आहे. त्यातील एक डबा महिलांसाठी राखीव असेल. या 70 लोकलच्या रोज 250 ते 300 फेऱ्या होतील. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी होईल’, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.