परभणीत 30 जणांना विषबाधा

  जय महाराष्ट्र न्यूज, परभणी   परभणीत 30 जणांना नाश्तातून विषबाधा झाली आहे.   मानवत तालुक्यातील राजुरामध्ये ही घटना घडली. राजुरामध्ये 15 वर्षांपासून सप्ताहाचं आयोजन केलं जाते.   या सप्ताहात पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर ग्रामस्थांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यांना तात्काळ मानवतच्या ग्रामीण रुग्णालयात आणि परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.   त्यांची प्रकृती स्थिर […]

परभणीत 30 जणांना विषबाधा

 

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

 

परभणीत 30 जणांना नाश्तातून विषबाधा झाली आहे.

 

मानवत तालुक्यातील राजुरामध्ये ही घटना घडली. राजुरामध्ये 15 वर्षांपासून सप्ताहाचं आयोजन केलं जाते.

 

या सप्ताहात पोह्यांचा नाश्ता केल्यानंतर ग्रामस्थांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. त्यांना तात्काळ मानवतच्या ग्रामीण रुग्णालयात आणि परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.

 

त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी म्हटले. दरम्यान पोहे बनवण्याची कढई स्वच्छ न धुतल्यानं आणि दूषित पाण्यामुळे ही विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number