याला शिक्षक म्हणायचे की हैवान? 3 वर्षाच्या चिमुरड्याला डोळे सुजेपर्यंत मार-मार मारले

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी   शिक्षकांना विद्यार्थ्यांचे दुसरे माता-पिता म्हटले जाते. आई-वडीलांप्रमाणेच शिक्षकही मुलांवर चांगले संस्कार करतात. पण, पिंपरीतील एका शिक्षकाचे हैवानी कृत्य केले आहे. या शिक्षीकाने एका विद्यार्थाला बेदम मारहाण केली आहे. या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचे डोळे सुजले आहेत.       तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेत जखमी झालेला देव कश्यप […]

याला शिक्षक म्हणायचे की हैवान?  3 वर्षाच्या चिमुरड्याला डोळे सुजेपर्यंत मार-मार मारले

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

 

शिक्षकांना विद्यार्थ्यांचे दुसरे माता-पिता म्हटले जाते. आई-वडीलांप्रमाणेच शिक्षकही मुलांवर चांगले संस्कार करतात. पण, पिंपरीतील एका शिक्षकाचे हैवानी कृत्य केले आहे. या शिक्षीकाने एका विद्यार्थाला बेदम मारहाण केली आहे. या शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचे डोळे सुजले आहेत.    

 

तीन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेत जखमी झालेला देव कश्यप नावाचा विद्यार्थी एका कोचिंग क्लासमध्ये शिकवणीसाठी जात होता. 

 

या क्लासमधील शिक्षिकेने एका शुल्लक कारणावरुन देवला लाकडी पट्टीने हातावर, पाठीवर आणि डोक्यावर मार दिला आहे. या मारहाणीमुळे देवच्या डोळ्यांना सूज आली आहे.  

 

शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे संतप्त पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि या शिक्षिकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार या महिलेला अटक करण्यात आली आहे. 

 

बुधवारी या शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number