टाकीत पडून 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सोलापुर शहरातील तुळजापूर रोडवरील दत्तात्रय विजय साळुंखे या 3 वर्षाच्या चिमुकल्याचा सिंटेक्स टाकीत बुडून आपला जीव गमावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शुक्रवार पासून हा चिमुकला राहत्या घरातून गायब झाला होता. वडील विजय साळुंखे यांनी गल्लीमध्ये व नातेवाईकांकडे शोधाशोध केल्यानंतर त्यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दत्तात्रय बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. […]

टाकीत पडून 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सोलापुर शहरातील तुळजापूर रोडवरील दत्तात्रय विजय साळुंखे या 3 वर्षाच्या चिमुकल्याचा सिंटेक्स टाकीत बुडून आपला जीव गमावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

शुक्रवार पासून हा चिमुकला राहत्या घरातून गायब झाला होता. वडील विजय साळुंखे यांनी गल्लीमध्ये व नातेवाईकांकडे शोधाशोध केल्यानंतर त्यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात दत्तात्रय बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती. सकाळी विजय साळुंखे हे अंघोळीसाठी गेले असताना त्यांचे लक्ष 1000 लिटर च्या पाण्याच्या टाकीकडे गेले. या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे पडले होते.त्यांना संशयास्पद वाटल्याने विजय साळुंखे यांनी सिंटेक्स टाकीवर चढून डोकावून पाहिले असता, दत्तात्रयचा मृतदेह टाकीमध्ये तरंगताना आढळला.

त्यांनी ताबडतोब टाकीत उतरून मृत चिमुकल्याला बाहेर काढले.यानंतर पोलीसांना ताबडतोब या घटनेची माहिती दिली. आपल्या लहान मुलाचा मृतदेह पाहून आईने हंबरडा फोडला. 3 वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तुळजापूर नाका परिसरात शोककळा पसरली आहे. विजय साळुंखे हे बांधकाम मिस्त्री म्‍हणून काम करतात तर दत्तात्रय आई गृहिणी आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तपास सुरू आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number